‘ते’ रेल्वेत बॉम्बस्फोट करणार!
By Admin | Updated: December 4, 2014 01:17 IST2014-12-04T01:17:00+5:302014-12-04T01:17:00+5:30
मडगाव : गोव्यात आत्मघातकी पथके पोहोचली असून, धावत्या रेल्वेत व रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविणार, अशा आशयाच्या निनावी पत्राने बुधवारी पोलिसांची झोप उडविली.

‘ते’ रेल्वेत बॉम्बस्फोट करणार!
मडगाव : गोव्यात आत्मघातकी पथके पोहोचली असून, धावत्या रेल्वेत व रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविणार, अशा आशयाच्या निनावी पत्राने बुधवारी पोलिसांची झोप उडविली. उशिरापर्यंत पोलिसांनी सर्व रेल्वे तसेच रेल्वे स्थानकांची कसून तपासणी केली. मात्र, काहीच सापडू शकले नाही.
मडगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना आलेल्या एका पत्राने बुधवारी दुपारी पोलिसांची धावपळ झाली. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी हे पत्र पाठविण्यात आले होते. पत्राच्या खाली मजकूर लिहिणाऱ्याने आपल्या नावाचा ‘सेवक’ असा उल्लेख केला होता.
हे पत्र हाती पडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढला. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक मोहन नाईक, कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष देसाई, सीआयडी विभागाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब निकामी करणारे पथकही बोलविण्यात आले. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेंचीही कसून तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)