शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, ८ दिवस पुरेल एवढा पेट्रोलसाठा उपलब्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:25 IST

राज्यात पेट्रोल टंचाई निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात पेट्रोल टंचाई निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले असून आठ दिवस पुरेल एवढा पेट्रोलसाठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. लोकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेवेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना राज्यातील काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपल्याचे तसेच वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आणले असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. लोकांनी पंपांवर रांगा लावून उगाच टाक्या फूल करू नयेत.

बुकिंगनंतर मिळणार १५ दिवसांत सिलिंडर

घरगुती गॅस सिलिंडरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. 'लोकांनी उगाच साठेबाजी करू नये. बुकिंग केल्यानंतर १५ दिवसात सिलिंडर मिळेल. व्यावसायिक एलपीजीच्या बाबत थोड्या अडचणी आहेत. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत.

'माझे घर'ला वर्षभराची मुदतवाढ

'माझे घर' योजनेचा कालावधी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच महिन्यात या योजनेची मुदत संपणार होती. परंतु आता वटहुकूम काढून मुदत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, लोकांना अर्ज भरण्यास सोयीस्कर व्हावे यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

तिवरे-वरगाव ग्रामपंचायतीला माशेल बसस्थानकावरील गाळ्याचे मासिक भाडे माफ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

वास्कोतील गोवा हाउसिंग बोर्डाच्या ५४४ घरांसाठी बांधकाम पूर्णता व अधिवास दाखला शुल्क माफ. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sufficient Petrol Stock; No Need to Panic: CM Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant assures adequate petrol reserves, discouraging panic buying. Gas cylinders are readily available, with a 15-day delivery period post-booking. 'Majhe Ghar' scheme gets a one-year extension for application ease. Other cabinet decisions include waiving fees for housing and granting rental waivers.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढ