शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात तिसरे विद्यालय लुटले, गोव्यात चोरट्यांचा सुळसुळाट 

By पंकज शेट्ये | Updated: March 11, 2024 17:48 IST

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयात चोरट्यांनी केला हात साफ.

पंकज शेट्ये,वास्को: गेल्या सात दिवसात मुरगाव तालुक्यातील तिसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. दाबोळीतील केशव स्मृती माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या गॅटचे टाळे फोडून अज्ञात चोरट्यांनी विद्यालयात प्रवेश करून २५ हजाराची रोख रक्कम लंपास करण्याबरोबरच २५ हजाराच्या मालमत्तेची नासधूस केली. सात दिवसात मुरगाव तालुक्यातील तिसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याने मुरगाव तालुक्यातील इतर विद्यालयांच्या सुरक्षेबाबत अनेकांना चिंता निर्माण झाली आहे.

केशव स्मृती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुष्मा कोरगावकर यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार सोमवारी (दि.११) सकाळी विद्यालय उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सकाळी आम्ही विद्यालयात आलो असता माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयाची दोन्ही प्रशासकीय कार्यालये अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील सामान - कागदपत्रे अस्थाव्यस्त टाकून दिल्याचे आढळून आले. तसेच उच्चमाध्यमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या दोन्ही प्रशासकीय कार्यालयातील कपाटे अज्ञात चोरट्यांनी फोडून आत असलेली सुमारे २५ हजाराची रक्कम लंपास केल्याचे आढळून आले. त्या व्यतिरिक्त चोरट्यांनी विद्यालयातील माझ्या आणि सहाय्यक मुख्याध्यापक राजेश्री जाधव यांच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजांचे टाळे फोडून आत प्रवेश केल्याचे आढळून आल्याची माहीती मुख्याध्यापक सुष्मा कोरगावकर यांनी दिली. 

आमच्या कार्यालयात पैसे नसल्याने त्यांना तेथून काहीच चोरण्यासाठी मिळाले नाही, मात्र आमच्या कार्यालयातील सामानसुद्धा चोरट्यांनी अस्थाव्यस्त टाकल्याचे दिसून आले. २५ हजाराची रोख रक्कम लंपास करण्याबरोबरच चोरट्यांनी विद्यालयातील कपाटांची नासधून करण्याबरोबरच कार्यालयाच्या दरवाजांचे टाळे फोडणे, गॅटचे टाळे फोडणे असे प्रकार करून विद्यालयाच्या थोड्या मालमत्तेला नुकसानी पोचवली आहे. आमच्या विद्यालयाला चोरीमुळे सुमारे ५० हजाराची नुकसानी झाल्याची माहीती मुख्याध्यापक कोरगावकर यांनी दिली. वास्को पोलीसांना चोरीची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. सात दिवसात मुरगाव तालुक्यात घडलेल्या तीन विद्यालयातील चोरी प्रकरणातील चोरट्यांना शोधून त्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करत असून चोरट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांना यश मिळते की नाही ते येणाऱ्या दिवसात समजणार आहे.

ह्या चोरीत सीसीटीव्ही डीव्हीआर पळवले नाहीत - मुरगाव तालुक्यातील पूर्वीच्या दोन विद्यालयात झालेल्या चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी मालमत्तेसहीत सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर सुद्धा गायब केले होते. मात्र केशव स्मृती विद्यालयात चोरी केलेल्या अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर लंपास केले नसल्याची माहीती प्राप्त झाली. ४ मार्चला मांगोरहील, वास्को येथील सेंट तेरेसा विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून १ लाखाची रक्कम लंपास करण्याबरोबरच सुमारे ३० हजाराचे सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर सुद्धा लंपास केले होते. ७ मार्चला वेळसांव येथील इन्फन्ट जीझस अकादमी विद्यालयात चोरट्यांनी घुसून तेथील रोख रक्कम आणि डीव्हीआर मिळून सुमारे ६५ हजाराची मालमत्ता लंपास केली होती. 

मुरगाव तालुक्यात सात दिवसात तीन विद्यालयात चोरीच्या घटना घडलेल्या असून त्यापूर्वी गोव्याच्या अन्य काही भागातील विद्यालयात सुद्धा चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विद्यालयांच्या सुरक्षेसाठी शिक्षण खात्याने रात्रीच्या वेळी विद्यालयांना सुरक्षा रक्षक द्यावा अशी मागणी होत आहे.

विद्यालयात घुसले दोन चोर - केशवस्मृती विद्यालयात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर लंपास केला नसल्याने विद्यालयात दोन चोरटे चोरीसाठी घुसल्याचे फुटेजवरून उघड झाले आहे. त्या अज्ञात चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क घालून त्यांचा चेहरा लपवला होता असे फुटेजवरून उघड झाल्याची माहीती विद्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. केशव स्मृती विद्यालयात झालेल्या चोरीच्या त्या सीसीटीव्ही फुटेजचा चोरट्यांना गजाआड करण्यासाठी वास्को पोलीसांना कीतपत फायदा होतो ते येणाऱ्या दिवसात कळणार.

टॅग्स :goaगोवाtheftचोरीPoliceपोलिस