गोव्यातील असोळणा येथे हायस्कुलमध्ये चोरी: ३ लाख ४० हजारांची रोकड पळविली
By सूरज.नाईकपवार | Updated: October 11, 2023 17:16 IST2023-10-11T17:15:11+5:302023-10-11T17:16:35+5:30
गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हायातील असोळणा येथील एका हायस्कुलात अज्ञात चोरटयाने चोरी करुन आतील तीन लाख चाळीस हजार रुपये पळवून नेले.

गोव्यातील असोळणा येथे हायस्कुलमध्ये चोरी: ३ लाख ४० हजारांची रोकड पळविली
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हायातील असोळणा येथील एका हायस्कुलात अज्ञात चोरटयाने चोरी करुन आतील तीन लाख चाळीस हजार रुपये पळवून नेले. रेजिना मार्तीस या हायस्कुलमध्ये ही घटना घडल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. आज बुधवारी चाेरीची वरील घटना उघडकीस आल्यानतंर यासबंधी पोलिसांत रितसर तक्रार नोंदविली गेली.
कुकंळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिलेल्या माहितीनुसार या हायस्कुलाच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून चोरटयांनी आत शिरुन रोकड पळवली मंगळवारी रात्री चोरीची वरील घटना घडली. विदयार्थ्यांच्या गणवेशासाठी ही रक्कम होती अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. हायस्कुलच्या मुख्याध्यापिका मिरियाम आफांन्सो यांनी याप्रकरणी पाेलिसांत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी नंतर घटनास्थळी धाव घेउन चाेरीचा पंचनामा केला. ठसेतंज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.