पेड-सुरावली येथे बंगल्यात चोरी
By Admin | Updated: November 30, 2014 01:00 IST2014-11-30T00:58:28+5:302014-11-30T01:00:24+5:30
मडगाव : पेड-सुरावली येथेही चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष्य केले.

पेड-सुरावली येथे बंगल्यात चोरी
मडगाव : पेड-सुरावली येथेही चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष्य केले. या बंगल्यातील सुवर्णालंकार व रोकड मिळून पावणेनऊ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू आहे.
मूळ मुंबई येथील गीतांजली नाईक (३५) यांच्या मालकीच्या बंगल्यात ही चोरी झाली. चोरट्यांनी बंगल्याच्या स्वयंपाकघराचे दार फोडले व आत शिरून कपाट फोडून आतील वस्तू लंपास केल्या. यात डायमंडचे एक मंगळसूत्र, बांगड्या, एक हजार अमिराती दिराम व अमेरिकन डॉलर्ससह एक लाखाच्या रोकडचाही समावेश आहे. रात्री दीड ते चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पहाटे चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर नाईक यांनी कोलवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांनाही आणण्यात आले. (प्रतिनिधी)