अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघणारी ट्रेन वाटेतच अपघातग्रस्त
By आप्पा बुवा | Updated: September 17, 2023 17:06 IST2023-09-17T17:06:20+5:302023-09-17T17:06:37+5:30
शिरोडा येथील अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघालेली क्रेनलाच अपघात होण्याची घटना फोंडा ढवळी उड्डाण पुलावर सकाळी घडली.

अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघणारी ट्रेन वाटेतच अपघातग्रस्त
फोंडा -शिरोडा येथील अपघात ग्रस्त कदंबा बस काढण्यासाठी निघालेली क्रेनलाच अपघात होण्याची घटना फोंडा ढवळी उड्डाण पुलावर सकाळी घडली.
सविस्तर वृत्तानुसार, शिरोडा येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच क्रेन क्रमांक एन एल- ०१- एल ५८२८ ही शिरोडाच्य च्या दिशेने निघाली होती. बांदोडा परिसरातील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर वाहक ट्रकची( क्रमांक जीए- ०५- टी -) धडक क्रेनला बसली. सदरची धडक बसताच क्रेनच्या केबिन चा भाग मोडला गेला.
केबिनमध्ये असलेले क्रेन चालक मिथुन कुमार सहा( वय 31) हे ह्या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिक्सर वाहू ट्रकचा चालक सुद्धा जखमी झाला असून त्याला उपचार करून घरी जाऊ देण्यात आले आहे.