भरधाव वेगाने आलेली चारचाकी दुभाजकाला धकडून रस्त्यावर उलटली
By पंकज शेट्ये | Updated: February 9, 2024 21:06 IST2024-02-09T21:06:25+5:302024-02-09T21:06:42+5:30
भरधाव वेगाने असलेल्या चारचाकीची धडक दुभाजकाला बसताच ती रस्त्यावर उलटून काही अंतर पुढे गेली.

भरधाव वेगाने आलेली चारचाकी दुभाजकाला धकडून रस्त्यावर उलटली
वास्को: उशिरा रात्री वरुणापूरी महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीची धडक रस्त्याच्या मदोमद असलेल्या दुभाजकाला बसून चारचाकी रस्त्यावर उलटली. अपघातग्रस्त झालेल्या त्या चारचाकीत चालकासहीत एकूण तिघेजण प्रवास करत असून सुदैवाने ते कीरकोळ जखमा होऊन बचावले.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.८) रात्री ११.४५ वाजता तो अपघात घडला. मांगोरहील येथे राहणारा २० वर्षीय सचिन जैस्वार भरधाव वेगाने दाबोळी विमानतळाच्या दिशेतून मांगोरहील येथे चारचाकीने येत होता. त्यावेळी त्याच्या चारचाकीत अन्य दोघेजण असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. जेव्हा त्याची चारचाकी वरुणापूरी परिसरात पोचली त्यावेळी त्याच्या चारचाकीची धडक रस्त्याच्या मदोमद असलेल्या दुभाजकाला बसली. भरधाव वेगाने असलेल्या चारचाकीची धडक दुभाजकाला बसताच ती रस्त्यावर उलटून काही अंतर पुढे गेली. अपघातावेळी त्या महामार्गावरून अन्य कुठलेच वाहन जात नसल्याने तेथे होणारा पुढचा अनर्थ टळला. त्या अपघातात चारचाकी चालक सचिन याला कीरकोळ जखम झाली असून अपघातग्रस्त झालेल्या वाहनातील तिघेहीजण सुदैवाने सुखरूप बचावल्याची माहीती पोलीसांनी दिली. अपघात एकदम भयंकर होता, मात्र त्यातून तिघेहीजण सुखरूप बचावल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ असेच म्हणावे लागणार.