शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प लोकांवर लादणार नाही, कोडार येथील 'आयआयटी' रद्द: मंत्री सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:03 IST

मंत्री शिरोडकर म्हणाले की, आयआयटीला कोडारवासीयांकडून होत असलेल्या विरोधाबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे सांगितलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कोडारला आयआयटी होणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी बोललोय', असे स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोडार कोमुनिदादचे अध्यक्ष प्रशांत गावकर, सरपंच मधू खांडेपारकर, पंचसदस्य अक्षय गावकर हे याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, आयआयटीला कोडारवासीयांकडून होत असलेल्या विरोधाबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे सांगितलेले आहे. लोकांना आयआयटी नको असेल ती लादू या नको, असे मुख्यमंत्र्यांचेही म्हणणे आहे.

शिरोडकर म्हणाले की, सध्या फर्मागुडी येथे आयआयटी कॅम्पस आहे. तेथेच त्यांना योग्य त्या सुविधा देऊन तेथे ती वाढवता येईल. तेथे अतिरिक्त साडेतीन लाख चौरस मीटर जमीन आहे. परंतु, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे साधारणपणे तीन हजार विद्यार्थी व आयआयटी कॅम्पस तेथे आल्यास आणखी चार हजार विद्यार्थी यामुळे तेथे गर्दी होईल, हेदेखील तेवढेच खरे आहे.

शिरोडकर म्हणाले की, कोडार येथे जी जागा या प्रस्तावित आयआयटीसाठी वापरली जाणार होती, तेथे पाच ते सात लाख चौरस मीटर जमीन खडकाळ आहे. तेथे कोणतीही लागवड केली जात नाही. आयआयटी प्रकल्पासाठी कमीत कमी दहा लाख चौरस मीटर जमीन लागते. या ठिकाणी एकूण १९ लाख चौरस मीटर जमीन उपलब्ध होती. यातील पाच लाख चौरस मीटर जमीन शेतकऱ्यांची आहे. त्यांना सनदाही दिलेल्या आहेत.शेतकऱ्यांच्या जमिनीला सरकारने हात लावला नसता. उलट आयआयटी आली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी कुंपण बांधून मिळाले असते. आयआयटीचा त्यांना कोणताही त्रास झाला नसता. परंतु, या पंधरा आदिवासी शेतकरी कुटुंबांनी विरोध केला. सरकार कोणाचीही जमीन घेणार नव्हते. शेतकऱ्यांची तर मुळीच नाही.

याबाबत शिरोडकर म्हणाले की, साळावलीचे धरण बांधताना लाखो चौरस मीटर जमीन संपादित करावी लागली. तेथील ५५० कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार चौरस मीटर जमीन दिली. परंतु, या भूखंडांमध्ये अजून लागवड केली जात नाही. चार दिवसांपूर्वी सांगे दौऱ्यावर भी गेलो असता काही प्रमाणात आढावा घेतला. शेतकऱ्यांनी जमिनी कसायला हव्यात.

शिरोडकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार कालांतराने प्रत्येक जिल्ह्यामध्येही आयआयटी येऊ शकतात. गोवा मात्र अशा प्रकल्पाला विरोधामुळे मुकण्याची भीती आहे. आयआयटी आल्याने संशोधनाला वाव मिळतो. मोठ्या कंपन्यांमध्ये अभियंते आयआयटी शिक्षितच घेतले जातात. व्यवसाय, नोकरी यात मोठ्या संधी होतात. असा शैक्षणिक प्रकल्प गोव्यात होणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, फोंडा तालुका शैक्षणिक हब मानला जातो. दोन अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन वैद्यकीय महाविद्यालये (होमिओपॅथी व आयुर्वेदिक), तसेच फार्मसी कॉलेज या तालुक्यात आहे.

विरोध करण्याची मानसिकता

मी गेली चाळीस वर्षे राजकारणात आहे. परंतु, काही लोकांची प्रत्येक प्रकल्पास विरोध करण्याची मानसिकता बनली आहे. अशा विरोधामधून विकासाला 'खो' बसतो. देशभरात २३ राज्यांमध्ये आयआयटी आहे. कोडारला ती आली असती, तर गोवा २४ वे राज्य ठरले असते. राज्यात किमान चार ठिकाणी विरोध झाल्याने आयआयटी गोव्यातून बाहेर जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भीतीही शिरोडकर यांनी व्यक्त केली.

जनतेच्या शक्तीसमोर सरकार नमले : सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सरकार जनतेच्या शक्तीसमोर नमले. कोडारवासीयांनी एकत्रितपणे उठवलेल्या आवाजाचा विजय झाला. भाजपच्या मयुरीला लोकांनी चोख उत्तर दिले, गोमंतकीयांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गोवा फॉरवर्ड नेहमीच सज्ज आहे.

पर्यावरण नष्ट करून प्रकल्प नकोच : मनोज परब

आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी कोडारची प्रस्तावित आयआयटी रद्द केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, हा जनतेचा विजय आहे. आयआयटीकरिता किमान ५०० एकर जमीन लागते. वनक्षेत्र, तसेच पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग नष्ट केल्याशिवाय असे प्रकल्प येऊ शकत नाहीत. राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून तसे कळवायला हवे. गोव्यातील गाव वाचवण्यासाठी आरजी नेहमीच तत्पर आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kodar IIT project cancelled; Won't impose projects on people: Minister

Web Summary : The proposed IIT project at Kodar is cancelled due to local opposition. Minister Shirodkar stated the government won't force projects on unwilling residents. An alternative location at Farmagudi is being considered, despite potential overcrowding.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण