शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई

By वासुदेव.पागी | Updated: May 22, 2024 16:59 IST

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पणजीः गुन्हेगारी संबंधी जुनी कायदा संहिता रद्द करून नवीन संहिता लागू केल्यामुळे  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करणे सुलभ होईल असा विश्वास गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.  

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बिश्नोई बोलत होते. ते म्हणाले की  गुन्हेगारीचा जुना कायदा  मोडीत काढून नवीन कायदा लागू केल्याने अनेक महत्तवाकांक्षी बदल अपेक्षित आहेत.  गुन्हे प्रकरणे धसास लागण्याचे प्रमाणही वाढेल आणि गुन्हेगारी सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढेल.  कारण गुन्हेगारी सिद्ध होण्यासाठी येणाऱ्या अनेक तांत्रिक अडथळ्यांचा विचारही नवीन कायद्यात करण्यात आला आहे. सुधारीत कायदा हा तपास कामाला अधिक गती देणारा आणि तपास कामात पारदर्शकता आणणारा आहे असे त्यांनी सांगितले. 

विशेष करून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना देण्यात आलेली मान्यता हे नवीन कायद्याचे वैशिष्ठ्य आहे. तपास कामेही त्यामुळे लांबणीवर पडणार नाहीत. नागरिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीवर तीन दिवसात कारवाई करणे पोलीसांना सक्तीचे असणार आहे.  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्यांचे त्रांकडे मडणारी हा नवीन कायदा आहे. कारण अशा लोकांविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडथळे निकालात काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित संशयितांनी ताब्यात देण्या संबंधीचा करार अनेक देशांशी करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे अधिक्षक आयपीएस अधिकारी अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक आयपीएस अधिकारी राहुल गुप्ता यांनी अनुक्रमे  भारतीय नाय्य संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  यांची माहिती पत्रकारांना यावेळी दिली.