...'त्या' मंत्र्यांनी माफी मागावी, मायकल लोबो यांनी केली मागणी
By काशिराम म्हांबरे | Updated: February 7, 2024 13:16 IST2024-02-07T13:16:07+5:302024-02-07T13:16:20+5:30
Goa News: कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या व्हायरल झालेल्या आॉडिओवर टिप्पणी करताना कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो यांनी मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींनी अशी अपमानास्पद वागणुक देणे चुकिचे असल्याने मंत्र्यांनी संबंधीत अधिका-याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

...'त्या' मंत्र्यांनी माफी मागावी, मायकल लोबो यांनी केली मागणी
- काशिराम म्हांबरे
म्हापसा - कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या व्हायरल झालेल्या आॉडिओवर टिप्पणी करताना कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो यांनी मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींनी अशी अपमानास्पद वागणुक देणे चुकिचे असल्याने मंत्र्यांनी संबंधीत अधिका-याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
कळंगुट येथील आपल्या कार्यालयात घडलेल्या या प्रकारावर भाष्य करताना लोबो यांनी एकूण प्रकार निषेदार्थ असल्याचे सांगितले. अशा प्रकारातून इतरांना खास करुन गोव्याचे भवितव्य असलेल्या लहान मुलांना विद्यार्थ्यांना चुकीची शिकवण तसेच उदाहरण देत असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवावा असेही लोबो म्हणाले. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री किंवा पक्षाकडून आवश्यक अशी दखल घेणे गरजेचे असल्याचे ही लोबो म्हणाले.
एखादा मंत्री किंवा सरकारी अधिकारी काम करीत नसल्यास असे प्रकार उघडकीस आणणे अत्यावश्यक आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर अशा प्रकारांवर उघडपणे अनेकदा बोललो आहे पण अपशब्द कधीच वापरला नाही. तसेच अपशब्द वापरणे किंवा चुकीची भाषा वापरणे हा त्यावरील तोडगा नसल्याचे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.