सरकारसह विरोधकांची कसोटी
By Admin | Updated: October 24, 2015 02:58 IST2015-10-24T02:54:07+5:302015-10-24T02:58:13+5:30
मडगाव/पणजी : राज्यातील ११ नगरपालिकांच्या एकूण १५९ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी पार पडेल.

सरकारसह विरोधकांची कसोटी
मडगाव/पणजी : राज्यातील ११ नगरपालिकांच्या एकूण १५९ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी पार पडेल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेससह काही अपक्ष आमदारांसाठीही या पालिका निवडणुका म्हणजे मोठी कसोटी आहे.
विधानसभेची निवडणूक अवघ्या दीड वर्षात होणार आहे. त्यामुळे भाजपने अकरा पालिकांच्या निवडणुका म्हणजेच विधानसभेची सेमीफायनल आहे, असे समजून प्रचारकार्य केले. अकरा पालिकांच्या निवडणूक प्रचारावेळी भाजप पुरस्कृत उमेदवारांसाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह सर्वच भाजप मंत्री व आमदारांनी जोरदार प्रचारकाम केले. दुसऱ्या बाजूने अपक्ष आमदार विजय सरदेसाई, नरेश सावळ, काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, बाबू कवळेकर, विश्वजित राणे यांनीही आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसली.
दरम्यान, निवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी संपला. मतदान प्रक्रियेची सारी तयारी पूर्ण झाली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)