ट्रकमालकांना तात्पुरता दिलासा
By Admin | Updated: November 1, 2015 01:55 IST2015-11-01T01:55:24+5:302015-11-01T01:55:39+5:30
फोंडा : गेल्या काही दिवसांपासून ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी सुधारित दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेच्या सदस्यांना अखेर शनिवारी तात्पुरता दिलासा मिळाला

ट्रकमालकांना तात्पुरता दिलासा
फोंडा : गेल्या काही दिवसांपासून ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी सुधारित दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेच्या सदस्यांना अखेर शनिवारी तात्पुरता दिलासा मिळाला. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी सायंकाळी भामई-पाळी येथील पोलीस आउटपोस्टवर ट्रकमालकांसह सेसा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्रकमालक संघटनेच्या काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्यांवर विचार करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ट्रक सोडण्यात आले.
बॉम्बे रोड जंक्शन-पाळी येथे सेसा कंपनीच्या खनिजाची वाहतूक करणारे सुमारे १६ ट्रक शनिवारीही अडविण्यात आले. तत्पूर्वी ई-लिलाव झालेल्या खनिजाच्या वाहतुकीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी जमलेल्या ट्रकमालक संघटनेच्या सुमारे २00 सदस्यांनी शुक्रवारी (दि. ३०) सेसा कंपनीशी बोलणी फिस्कटल्याने आक्रमक भूमिका घेत खनिज वाहतूक अडवून ठेवली होती. सेसा कंपनीने शुक्रवारी उशिरा उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांकडून संरक्षण मागितल्याने शनिवारी (दि.३१) खनिज वाहतूक होत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी बॉम्बे रोड येथे दाखल होत आंदोलनकर्त्या ट्रकमालक संघटनेला पाठिंबा दर्शविला. तसेच आपण मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलणी करून तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले. या वेळी संतप्त ट्रकमालकांनी खनिज माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या कागदपत्रांची तसेच वाहतुकीच्या नियमांचे (पान ६ वर)