तेजपालला तीन आठवड्यांसाठी जामीन

By Admin | Updated: May 20, 2014 01:38 IST2014-05-20T01:34:29+5:302014-05-20T01:38:42+5:30

पणजी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला तरुण तेजपाल याला सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांकरिता अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Tejpal gets bail for three weeks | तेजपालला तीन आठवड्यांसाठी जामीन

तेजपालला तीन आठवड्यांसाठी जामीन

पणजी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला तरुण तेजपाल याला सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांकरिता अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तेजपाल याची माता शकुंतला (८७) यांचे रविवारी मयडे येथे निधन झाल्यानंतर तेजपालने तिच्यावरील अंत्यसंस्कारास उपस्थित राहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी. एस. चौहान व न्यायमूर्ती ए. के. गिरी यांच्यासमोर त्याचा अर्ज सुनावणीस आला. तेजपालचे वकील अ‍ॅड. संदीप कपूर यांनी कोर्टाला तेजपालच्या मातेचे निधन झाल्याची माहिती देऊन जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली. सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ३0 नोव्हेंबरला त्याला अटक झाली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ तो कारागृहात आहे. तेजपालची माता ब्रेन ट्युमरच्या आजाराने गेले काही दिवस मृत्यूशी झुंज देत होती. दरम्यान, तिच्या पार्थिवावर येथील सांतइनेज स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजपाल या वेळी उपस्थित होता. (प्रतिनिधी)

Web Title: Tejpal gets bail for three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.