शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:59 IST

मडगावात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे 'कलागुरुजन' महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गंभीर आजारावर उपचासाठी शिक्षकांना दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजा मिळणार आहे. शिक्षकांची विनंती विचारात घेऊन त्याविषयीचा आदेश शिक्षण संचालक जारी करतील. वेतन श्रेणीसंदर्भात अर्थ खात्याशी चर्चा केली जाईल. शिक्षकांनी सातत्याने शिकणे गरजेचे आहे. जो शिकत नाही, तो शिक्षक असूच शकत नाही. शिक्षकांनी सातत्याने तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना शिकण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे (हिस्टंग) शिक्षकांसाठी 'कलागुरुजन' हा शैक्षणिक आणि सांस्कृतिक महोत्सव मंगळवारी रवींद्र भवनमध्ये झाला. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष भगीरथ शेट्ये, गोविंद पर्वतकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर आदी उपस्थित होते.

सर्वांत मोठा समुपदेशक जर कोण होऊ शकतो, तर तो शिक्षक आहे. विद्यार्थ्यांवर सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल तर तो शिक्षकाचा असतो. आई-वडिलांनी सांगितलेले एक वेळ मुले ऐकणार नाहीत, पण शिक्षकांनी सांगितले तर ते ऐकतील. म्हणून विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संवाद साधणे ही काळाची गरज आहे. कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, तरी जोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात नाते तयार होत नाहीत, तोपर्यंत मुले घडू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्याचे भविष्य ठरविणे हे शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे शिक्षकांनी नेहमीच अपडेट राहण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले, पुढील वर्षापासून उच्च माध्यमिक स्तरावर एनईपीची अंमलबजावणी केली जाईल. एनईपीचे जास्त लक्ष हे दर्जात्मक शिक्षणावर आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला गुणवंत शिक्षक लागेल.पायाभूत सुविधा व इतर गोष्टी या दुय्यम आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाचा दर्जा वाढवावा लागेल. जसा काळ बदलतो, तसे तंत्रज्ञान बदलते. पुढे आणखी प्रगती होईल. एआय येईल, पण एआय शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षकांना सतत स्वतःला अपग्रेड करावे लागणार आहे. तेव्हाच आम्ही मुलांना दर्जात्मक शिक्षण देऊ शकू.

फ्युचरिस्टिक एज्युकेशनवर विचार करण्याची गरज

मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांना राज्यात कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि कोणत्या अभ्यासक्रमांना मागणी आहे, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आयटीआयमध्ये हॉस्पिटॅलिटी कोर्स सुरू करण्यात आला आहे. अप्रेंटिसशिप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. भविष्य लक्षात घेऊन शिक्षण देण्याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षकांनी या फ्युचरिस्टिक एज्युकेशनचा विचार करावा. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत