Tata Mobile and Divo Two-wheeler Accident One killed | टाटा मोबाईल व डिवो दुचाकीतील अपघात एक ठार
टाटा मोबाईल व डिवो दुचाकीतील अपघात एक ठार

मडगाव: गोव्यातील  मडगाव शहरातील विदयानगर येथे आज गुरुवारी दुपारी टाटा मोबाईल व डिवो दुचाकीमध्ये अपघात होउन दुचाकीच्या मागे बसलेला बाशासाब ताझुददीन सुंकड (58) हा गंभीर जखमी होउन त्याचे निधन झाले. जखमी अवस्थेत त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले असता, तेथे त्याला मरण आले. मयत मोतीडोंगर - मडगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.  टाटा मोबाईल चालक परवेझ नवाझ मोहम्मद जमील खान (26) यच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

भारतीय दंड संहितेंच्या 279, 337 व 304 (अ) कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग पुढील तपास करीत आहेत. काल गुरुवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. टाटा मोबाईल व डिवो दुचाकी पॉवरहाउसच्या दिशेने जात होती. यावेळी टाटा मोबाईलची धडक डिवो दुचाकीला बसली. तोल गेल्याने दुचाकी दुभाजकावर आपटली व मागे बसलेला बाशसाब हा खाली पडून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचालक दामोदर भोसले ( रा. रुमडामळ - दवर्ली )हा किरकोळ जखमी झाला. टाटा मोबाईल चालक नमाजासाठी जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. तो फोंडा येथील रहिवाशी आहे. अपघाताची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमी बाशासाब याला हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे त्याचे निधन झाले.


Web Title: Tata Mobile and Divo Two-wheeler Accident One killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.