हणजूण होते टार्गेट!

By Admin | Updated: February 13, 2016 02:52 IST2016-02-13T02:46:14+5:302016-02-13T02:52:22+5:30

हणजूण/मुंबई : इस्रायली नागरिकांचे प्रार्थनेसाठी एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच येथील छाबड हाउस उडवून देण्याचे ठरले होते, अशी कबुली अमेरिकन नागरिक डेव्हीड

Target was a target! | हणजूण होते टार्गेट!

हणजूण होते टार्गेट!

हणजूण/मुंबई : इस्रायली नागरिकांचे प्रार्थनेसाठी एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच येथील छाबड हाउस उडवून देण्याचे ठरले होते, अशी कबुली अमेरिकन नागरिक डेव्हीड हेडलीने शुक्रवारच्या जबाबात दिल्याने हणजूण पुन्हा चर्चेत आले. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने तसा कट आखला होता, असा गौप्यस्फोटही हेडलीने केला.
अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदवताना हेडलीने ही माहिती दिली. अमेरिकन वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली साक्ष मध्यरात्री अडीच वाजता संपली. अमेरिकन नागरिक डेव्हीड हेडली २६/११च्या मुंबईच्या हल्ल्यात माफीचा साक्षीदार आहे.
हणजूण-वागातोर परिसरात पर्यटन हंगामात लक्षणीय गर्दी होते. येथील छाबड हाउसवर दहशतवाद्यांचा हल्ला होणार असल्याची माहिती काही वर्षांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हणजूण येथे छाबड हाउसच्या जागा आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी बदललेल्या आहेत. सध्याचे
छाबड हाउस हणजूण येथील सेंट अँथोनी प्रायस वाडो येथे भाड्याच्या घरात आहे. जानेवारी २०१६ मध्ये हे घर भाड्याने घेतले असून सध्या तेथे दोघे इस्रायली युवक राहातात. शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी प्रार्थनेसाठी १२ इस्रायली युवक जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार-पाच वर्षांपासून इस्रायली नागरिकांनी हणजूण येथून हरमल येथे स्थलांतर करणे पसंत केले आहे. तेथे आता मोठ्या संख्येने लोक प्रार्थनेसाठी एकत्र येतात. या स्थलांतरापूर्वी छाबड हाउसमध्ये एका वेळच्या प्रार्थनेसाठी २००हून अधिक इस्रायली नागरिक हणजूण येथे एकत्रित जमत असत. (प्रतिनिधी)

Web Title: Target was a target!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.