ताळगाव पंचायत निवडणूक : ताळगाव प्रोग्रेससिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटकडून उमेदवारी अर्ज
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 10, 2024 13:48 IST2024-04-10T13:48:11+5:302024-04-10T13:48:11+5:30
Talgaon Panchayat Election : ताळगाव पंचायतीत मोन्सेरात पॅनल आपली परंपरा कायम ठेवणार आहे. मात्र आम्हाला विरोधक सुद्धा हवेत. विरोधक असले की चुका दाखवतात, यामुळे काम करताना त्यात सुधारणा करणे शक्य होते असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

ताळगाव पंचायत निवडणूक : ताळगाव प्रोग्रेससिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटकडून उमेदवारी अर्ज
पणजी : ताळगाव पंचायत निवडणूकीसाठी ताळगाव प्रोग्रेससिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंट अंतर्गत मोन्सेरात पॅनलच्या ११ उमेदवारांनी बुधवारी तिसवाडी मामलेदार कार्यालयात अर्ज सादर केले. यावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात उपस्थित होते. ताळगाव पंचायतीत मोन्सेरात पॅनल आपली परंपरा कायम ठेवणार आहे. मात्र आम्हाला विरोधक सुद्धा हवेत. विरोधक असले की चुका दाखवतात, यामुळे काम करताना त्यात सुधारणा करणे शक्य होते असे मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.
मंत्री बाबूश म्हणाले, की ताळगाव पंचायतीमधील काही प्रभाग महिलांसाठी आरक्षित केल्याने आम्हाला फटका बसला असल्याचा आरोप विरोधक करीत आहे. प्रभाग आरक्षित करणे हे आपले नव्हे तर ते निवडणूक आयोगाचे काम आहे.आपल्याला मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांनी आरोप केले , म्हणून काही होत नाही. मागील २५ वर्षात आपल्या विरोधात काम करणाऱ्या एकाही विरोधकाची आपण सतावणुक केलेली नाही. जर तसे असेल तर त्यांनी असा एक तरी विरोधक दाखवून द्यावा, ज्याची आपण सतावणुक केली असे थेट आव्हान त्यांनी दिले.