शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत एसटी आरक्षणाचा निर्णय घ्या; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:18 IST

'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन' आक्रमक; केंद्राने अधिसूचना काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी 'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने मतदारसंघ आरक्षणाची प्रक्रिया पुढील १५ दिवसांत सुरू करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला.

मडगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष अॅड. जॉन फर्नाडिस, उपासो गावकर, गोविंद शिरोडकर आणि जोजेफ वाझ यांनी ही भूमिका स्पष्ट केली. 'द रिअॅडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्युल्ड ट्राइब्ज इन असेंब्ली कॉन्स्टिट्यूएन्सीज ऑफ द स्टेट ऑफ गोवा अॅक्ट, २०२५' या कायद्याला मंजुरी मिळून आणि राजपत्रात प्रसिद्ध होऊन आठ महिने उलटले, तरी अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

"जोपर्यंत केंद्र सरकार अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत मतदारसंघ फेररचना प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही," असे स्पष्ट करत अॅड. फर्नाडिस यांनी आगामी २०२७ च्या निवडणुकांचा संदर्भ दिला. जानेवारी २०२७ मध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, अधिसूचना उशिरा निघाल्यास फेररचनेसाठी आवश्यक ३-४ महिन्यांचा कालावधी मिळणार नाही आणि एसटी समाज आरक्षणापासून वंचित राहू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

काही सत्ताधारी आमदारांकडून कायद्याच्या अंमलबजावणीला विलंब करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. एसटी बहुल मतदारसंघांमध्ये सध्या खुल्या प्रवर्गातील आमदार असल्याने राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा दावा संघटनेने केला.

सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण राज्यातील एसटी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देत संघटनेने आपली भूमिका अधिकच ठाम केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

एसटी समाजासाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी २०२५ चा कायदा मंजूर झाला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिसूचना केंद्र सरकारने अद्याप काढलेली नाही. या विलंबामुळे मतदारसंघ फेररचना प्रक्रिया रखडली असून, २०२७च्या निवडणुकीत एसटी समाज आरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa ST Reservation: Decision Needed in 15 Days, Warns of Protest

Web Summary : Goa's ST community demands political reservation before upcoming elections. An organization warns of statewide protests if the central government delays the constituency delimitation process. Delay threatens ST reservation implementation for the 2027 elections, they claim.
टॅग्स :goaगोवाreservationआरक्षण