पर्रीकरांचा केजरीवालांवर निशाणा
By Admin | Updated: July 6, 2016 00:36 IST2016-07-06T00:36:50+5:302016-07-06T00:36:50+5:30
पर्रीकर यांनी 'आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांचे प्रत्यक्षपणे नाव न घेता ते म्हणाले की, गोव्याच्या संपत्तीवर अनेकांचा डोळा आहे

पर्रीकरांचा केजरीवालांवर निशाणा
पणजी : पर्रीकर यांनी 'आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांचे प्रत्यक्षपणे नाव न घेता ते म्हणाले की, गोव्याच्या संपत्तीवर अनेकांचा डोळा आहे, त्यांच्यापासून सावध रहा. हे स्वत: भ्रष्टाचारात नसल्याचे भासवतात; परंतु त्यांच्यासाठी त्यांचे सचिव भ्रष्टाचार करतात आणि तुरुंगात जातात.
विधानसभा निवडणुकीचे येणारे वर्ष हे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासाठी कसोटीचे असल्याचे नमूद करीत भाजपला विजय मिळवून द्या, असे आवाहन करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात येणा-या निवडणुकीची धुरा पार्सेकर यांच्याकडेच असेल, याची स्पष्ट ग्वाही दिली. षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त मंगळवारी मुख्यमंत्र्यांचा हजारो कार्यकत्र्याच्या उपस्थितीत पर्रीकर व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक
परीकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तसेच श्रीपाद यांच्या हस्ते मानपत्र देऊन पार्सेकर यांचा सन्मान करण्यात आला. महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा कुंदा चोडणकर यांनी स्मिता पार्सेकर यांची खणा-नारळाने ओटी भरली. संजय हरमलकर यांनी रेखाटलेले मुख्यमंत्र्यांचे तैलचित्र यावेळी त्यांना भेट देण्यात आले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्र ान्सिस डिसोझा, वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, आमदार नीलेश काब्राल, माजी आमदार प्रकाश शंकर वेळीप यांची यावेळी भाषणे झाली.