स्वाईन फ्लू पूर्ण नियंत्रणात!

By Admin | Updated: March 19, 2015 01:18 IST2015-03-19T01:14:54+5:302015-03-19T01:18:24+5:30

पणजी : राज्यात स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण आढळले असले आणि स्वाईन फ्लूबाधित दोघांचा मृत्यू झालेला असला, तरी राज्यात

Swine flu is under full control! | स्वाईन फ्लू पूर्ण नियंत्रणात!

स्वाईन फ्लू पूर्ण नियंत्रणात!

पणजी : राज्यात स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण आढळले असले आणि स्वाईन फ्लूबाधित दोघांचा मृत्यू झालेला असला, तरी राज्यात स्वाईन फ्लू पूर्ण नियंत्रणात आहे आणि त्यावर औषधोपचारही त्वरित केला जात आहे.
हॉस्पिसिओ इस्पितळ मडगाव, कॉटेज इस्पितळ चिखली-वास्को, आयडी इस्पितळ फोंडा, जिल्हा इस्पितळ, म्हापसा आणि बोबोळीतील गोमेकॉतही स्वाईन फ्लूवरील औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. स्वाईन फ्लूबाधित रुग्णासाठी वेगळ्या व्यवस्थेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
याविषयी आरोग्य खात्याचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर
यांना विचारले असता ते म्हणाले, स्वाईन फ्लूबाबत आरोग्य खाते अत्यंत जागरूक
आहे. याबाबत विनाकारण गैरसमज पसरविण्यापेक्षा स्वाईन फ्लू म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आणि काही लक्षणे दिसून आल्यास काय करावे, हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. राज्यात स्वाईन फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आहे. २४ रुग्णांना आतापर्यंत स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले असले, तरी त्यातील दोन वगळता बहुतेक
सर्वजण पूर्णपणे बरे होऊन इस्पितळातून घरीही गेले आहेत. स्वाईन फ्लूवर खात्रीचे उपचार असून खात्याकडून त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्वाईन फ्लू अनियंत्रित असलेल्या राज्यांतून किंवा ज्या ठिकाणी स्वाईन फ्लू झाला आहे, अशा ठिकाणी प्रवास करून गोव्यात आलेल्या लोकांनाच तो प्रथम झाल्याचे आढळून आले आहे. गोव्यात पहिला बळी नोंद झालेली व्यक्ती विदेशातून आली होती. २४ पैकी बहुतेक सर्वजण गोव्याबाहेर प्रवास करून आले होते. (पान ७ वर)

Web Title: Swine flu is under full control!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.