आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली
By Admin | Updated: July 25, 2015 03:02 IST2015-07-25T02:58:46+5:302015-07-25T03:02:50+5:30
पणजी : वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेले पोलीस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली केली आहे.

आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली
पणजी : वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेले पोलीस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांची अंदमान निकोबारला बदली केली आहे. वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य असलेले आयपीएस अधिकारी देशपांडे यांनी विद्युतकामाच्या बाबतीत, तसेच स्टेशनरी साहित्य खरेदी आणि बांधकामाच्या बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जनरेशन नेक्स्टचे दुर्गादास कामत यांनी हा भ्रष्टचार उघडकीस आणल्यानंतर उपमहानिरीक्षक रंगनाथन यांनी या प्रकरणी खात्यांतर्गत चौकशीही केली होती; परंतु त्यात देशपांडे यांना क्लीन चिट दिली होती. दक्षता खात्यानेही हे प्रकरण फाईलबंद करण्यास सांगितले होते.
देशपांडे यांना राजकीय अभय असल्याने त्यांचे काही वाकडे होऊ शकत नाही, असे मानले जात असतानाच ही बदली झालेली आहे. आयपीएस अधिकारी म्हणून बढती मिळाल्यानंतर देशपांडे यांची याआधीही मिझोरमला बदली झाली होती; परंतु ते तेथे गेले नाहीत. पर्रीकर सरकारनेही त्या वेळी त्यांना ठेवून घेतले. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशपांडे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून याबाबत विचारणा केली होती. (प्रतिनिधी)