विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

By Admin | Updated: December 18, 2015 01:54 IST2015-12-18T01:54:12+5:302015-12-18T01:54:45+5:30

पणजी : रिवण-सांगे येथील उत्कर्ष हायस्कूलचा शिक्षक प्रवास नाईक हा विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी शिक्षण

Suspending the molestant teacher | विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

पणजी : रिवण-सांगे येथील उत्कर्ष हायस्कूलचा शिक्षक प्रवास नाईक हा विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी शिक्षण खात्याच्या चौकशीवेळी प्रथमदर्शनी दोषी आढळला. यामुळे त्याला सेवेतून तत्काळ निलंबित केले जाईल. त्याला निलंबित करण्यास गुरुवारी हायस्कूल व्यवस्थापनास शिक्षण खात्याने परवानगी दिल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी येथे जाहीर केले.
हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने आपल्याला बाजूला बोलावले व आपला लैंगिकदृष्ट्या छळ केला, अशी तक्रार हायस्कूलच्या एका विद्यार्र्थिनीने
केली होती. विद्यार्थिनीच्या पालकाने हायस्कूल व्यवस्थापनास त्याविषयी
कल्पना देऊन कारवाईची मागणी केली होती.
शिक्षण खात्याने या विषयाची दखल घेऊन आरोप असलेल्या शिक्षकास आणि व्यवस्थापनासही गेल्या सोमवारी नोटीस पाठवली व गुरुवारी सुनावणी घेतली.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Suspending the molestant teacher