Suspected woman arrested on train journey in Goa | गोव्यात रेल्वे प्रवासात महिलेचा विनयभंग, संशयिताला अटक
गोव्यात रेल्वे प्रवासात महिलेचा विनयभंग, संशयिताला अटक

मडगाव: रेल्वे प्रवासात एका एकाव्वन वर्षीय महिला प्रवाशाचा विनयभंगाची घटना गोव्यात घडली. या प्रकरणात एका संशयिताला राज्यातील कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मोहनान (38) असे संशयिताचे नाव असून, तो मूळ केरळ येथील आहे.

जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेत थिवी ते मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान विनयभंगाची ही घटना घडली. संशयिताने पिडीत महिलेचा हात पकडला. मागाहून यासंबधी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय राणो हे पुढील तपास करीत आहे. भारतीय दंड संहितेंच्या 354 व 354 (ड) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
 


Web Title: Suspected woman arrested on train journey in Goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.