गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या
By सूरज.नाईकपवार | Updated: February 29, 2024 20:32 IST2024-02-29T20:32:14+5:302024-02-29T20:32:28+5:30
पिडीतेच्या पालकांनी यासबंधी पोलिसांत तक्रार केली होती.

गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या
मडगाव: गोव्यातील एका सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार पोलिसांनी शेजारच्या कर्नाटक राज्यातील प्रशांत बस्तावडकर (२२) याच्या बेळगाव येथील खानापुर तालुक्यातील नंदगड येथे मुसक्या आवळल्या. आज गुरुवारी कोलवा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपा देयकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
संशयितावर कोलवा पोलिस ठाण्यात भांदसंच्या ३७६ तसेच गोवा बाल कायदा कलम ८ व बाल सरंक्षण कायदयातंर्गत गुन्हा नोंद झाला होता. पिडीतेच्या पालकांनी यासबंधी पोलिसांत तक्रार केली होती. जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान संशयिताने अनेकदा तिच्यावर लैगिक अत्याचार केले होते.खानापुर, बेळगाव व बेताळभाटी येथे नेउन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले होते. ते साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दाखवून तो त्या युवतीकडून रक्कमही उधळीत होता.