लैंगीक अत्याचार प्रकरणी संशयितास अटक
By काशिराम म्हांबरे | Updated: June 9, 2023 22:13 IST2023-06-09T22:13:12+5:302023-06-09T22:13:23+5:30
काशीराम म्हांबरे / म्हापसा -एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी साळगाव पोलिसांनी सुनील राठोड ( मूळ, ...

लैंगीक अत्याचार प्रकरणी संशयितास अटक
काशीराम म्हांबरे / म्हापसा -एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी साळगाव पोलिसांनी सुनील राठोड ( मूळ, बिजापूर- कर्नाटक ) या संशयिताला अटक केली आहे.
पीडित मुलीच्या आईने यासंबंधी गेल्या आठवड्यात साळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर या प्रकरणात तपास करण्यासाठी तसेच संशयीताला अटक करण्यासाठी साळगांव पोलिसांचे पथक कर्नाटकाला पाठवण्यात आले होते पण पोलिसांच्या सुगावा लागताच त्यांच्या हातावर तुरी देऊन संशयित गोव्यात आला होता.
काल शुक्रवारी शेवटी साळगाव पोलिसांनी संशयिताला कळंगुट येथून मोठ्या शिताफिने अटक केली. राठोड याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३७६, तसेच गोवा बाल कायद्या अंतर्गत चा कलम ८ व पॉस्को कायदाखाली गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील पुढील तपास उपअधिक्षक विश्वेश कर्पे तसेच निरीक्षक मिलिंद भुईम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक नीलम गावस करीत आहे.