गोमेकॉ कर्मचाऱ्यांच्या भांडणामुळे शस्त्रक्रियांना विलंब

By Admin | Updated: July 3, 2015 01:29 IST2015-07-03T01:29:07+5:302015-07-03T01:29:16+5:30

पणजी : गोमेकॉतील शस्त्रक्रिया विभागातील नर्सेस आणि ‘ड’ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आपसांतील वाद विकोपाला गेल्यामुळे गुरुवारी गोमेकॉतील सर्व शस्त्रक्रियांना विलंब झाला.

Surgery delay due to Gomacco employees' quarrel | गोमेकॉ कर्मचाऱ्यांच्या भांडणामुळे शस्त्रक्रियांना विलंब

गोमेकॉ कर्मचाऱ्यांच्या भांडणामुळे शस्त्रक्रियांना विलंब

पणजी : गोमेकॉतील शस्त्रक्रिया विभागातील नर्सेस आणि ‘ड’ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आपसांतील वाद विकोपाला गेल्यामुळे गुरुवारी गोमेकॉतील सर्व शस्त्रक्रियांना विलंब झाला.
गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोमेकॉच्या दोन्ही शस्त्रक्रिया विभागांत गोंधळ माजला. ‘ड’ श्रेणी कर्मचारी विभाग आणि नर्सेस यांच्यात जुंपली होती. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी लोकही जमले होते. दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रियेसाठी ज्यांना गुरुवारी वेळ देण्यात आली होती, त्या रुग्णांचे नातेवाईक या प्रकारामुळे चिंताग्रस्त बनले होते. नंतर गोमेकॉच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा आमोणकर यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला व त्यामुळे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या शस्त्रक्रिया ठरल्याप्रमाणे करण्यात आल्या. गोमेकॉच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावरील शस्त्रक्रिया विभागातील ‘ड’ श्रेणी कर्मचाऱ्यांची ड्युटी वरच्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात लावल्यामुळे हे कर्मचारी संतापले. (पान २ वर)

Web Title: Surgery delay due to Gomacco employees' quarrel