शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

गोव्यात ईडीएमसाठी सनबर्नचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 13:00 IST

नववर्ष स्वागतासाठी गोव्यात चालू महिनाअखेरीस इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी सनबर्न कंपनीने सरकारकडे संपर्क साधलेला आहे.

पणजी : नववर्ष स्वागतासाठी गोव्यात चालू महिनाअखेरीस इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी सनबर्न कंपनीने सरकारकडे संपर्क साधलेला आहे. परंतु आधी थकबाकीची रक्कम भरा, नंतर विचार करू, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. गेल्या वर्षी गोव्यात ईडीएम होऊ शकला नाही. पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सनबर्नकडून प्रस्ताव आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सनबर्न आणि सुपरसोनिक कंपन्यांकडून २0१२-१३ पासूनची सुमारे ८.५ कोटी रुपयांची थकबाकी सरकारला येणे आहे. आजगांवकर म्हणाले की, ‘ ही थकबाकी आधी सरकारला मिळायला हवी.

सनबर्न किंवा अन्य कंपन्यांनी अर्ज करावेत. थकबाकी भरल्यास विचार करता येईल. परंतु वर्षअखेरीस नव्हे तर फेब्रुवारी दरम्यान अशा महोत्सवाचे आयोजन करता येईल.’ आजगांवकर पुढे म्हणाले की, ‘अधिकाधिक पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी अशा संगीत महोत्सवांची गरज आहे. डिसेंबरमध्ये एरव्हीच पर्यटकांची गर्दी असते त्यामुळे हॉटेलांच्या खोल्याही फुल्ल असतात. शिवाय वाहतूक कोंडीचेही प्रकार घडतात.’

इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलसाठी वर्षअखेर पर्यटक मोठ्या संख्येने हजरी लावतात. कांदोळी, वागातोरसारख्या किनाºयांवर हे फेस्टिव्हल व्हायचे तेव्हा वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असे आणि त्याचा उपद्रव स्थानिकांनाही होत असे. त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवांना स्थानिकांचा विरोध आहे. शिवाय याआधी अशा ईडीएममध्ये मादक पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेले आहेत त्यामुळे एनजीओंचाही विरोध आहे. 

सनबर्न आणि सुपरसोनिक कंपन्यांच्या थकबाकीबद्दल विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. 

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलgoaगोवा