नदीत उडी मारून महिला अभियंत्याची आत्महत्या

By Admin | Updated: November 30, 2015 02:03 IST2015-11-30T02:03:01+5:302015-11-30T02:03:09+5:30

मडगाव : राशोल येथील नदीपात्रात उडी मारून महिला अभियंत्याने आत्महत्या केली. तिचा मृतदेह रविवारी सापडला. लीना

Suicide of a female engineer by jumping into the river | नदीत उडी मारून महिला अभियंत्याची आत्महत्या

नदीत उडी मारून महिला अभियंत्याची आत्महत्या

मडगाव : राशोल येथील नदीपात्रात उडी मारून महिला अभियंत्याने आत्महत्या केली. तिचा मृतदेह रविवारी सापडला. लीना नेत्रावळकर (वय ४५) असे तिचे नाव असून मानसिक तणावाखाली तिने आत्महत्या केल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी आठ वाजता या महिलेचा मृतदेह नदीत तरंगताना आढळला. नेत्रावळकर यांचा मडगावातील सामाजिक क्षेत्रात वावर होता. चिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. लीना बोर्डा येथे राहात होत्या. शनिवारी रात्रीपासून त्या बेपत्ता होत्या. यासंबंधी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली होती. शनिवारी रात्री त्या आपल्या कारमधून (क्र. जीए 0८ आर २१९४) बाहेर निघाल्या होत्या.
रविवारी सकाळी राशोल येथील फेरी धक्क्याजवळ त्यांची कार सापडली. लीना यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of a female engineer by jumping into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.