सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ
By पूजा प्रभूगावकर | Updated: January 15, 2024 13:44 IST2024-01-15T13:43:37+5:302024-01-15T13:44:39+5:30
सूचना हिची सहा दिवसांची पोलिस कोठडी रविवारी संपुष्टात आली होती.

सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: सूचना सेठ हिच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ झाली आहे. सूचना हिची सहा दिवसांची पोलिस कोठडी रविवारी संपुष्टात आली होती.
त्यानुसार सोमवारी सकाळी पणजी येथील बाल न्यायालयात सूचना हिला कळंगुट पोलिसांनी हजर केले होते. सूचना हिची चौकशी करण्यासाठी आणखीन वेळ हवा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात मांडले. त्यानुसार न्यायालयाने तिच्या कोठडीत १९ जानेवारी पर्यंत म्हणजेच पाच दिवसांनी वाढ केली.
सूचना हिने बाल न्यायालयात आणले असता काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने आपला चेहराही झाकला होता. मात्र यावेळी तिने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.सूचना हिला तिच्याच पाच वर्षाच्या मुलाच्या खून प्रकरणी अटक झाली आहे. आपल्या माजी पती वेंकट रमण याच्यावरील राग काढण्याच्या उद्देशाने तिने मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह बॅगेत भरला होता. या खून प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.