शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

लोकसभेसाठी रणनीती: सर्व मंत्री, आमदारांची एकत्र बैठक; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:01 IST

दक्षिण, उत्तरच्या जागेचा आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारमधील सर्व मंत्री तसेच भाजपचे सर्व आमदार मगो पक्षाचे दोन्ही आमदार आणि तीन अपक्ष आमदार यांची मिळून एकत्र बैठक आज प्रथमच पणजीत होणार आहे. भाजपचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे ही बैठक घेण्यासाठी आज, बुधवारी सकाळीच गोव्यात दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होईल.

सावंत सरकार अधिकारावर येऊन आता दीड वर्षाचा कालावधी झाला. सत्ताधारी आघाडीची एकत्र बैठक कधीच झाली नव्हती. आज सकाळी साडेदहा वाजता सांतीनेज पणजी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होईल.

आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोवा, असे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मतांनी जिंकायला हवेत, असे लक्ष्य राजीव चंद्रशेखर यांना भाजपच्या श्रेष्ठींनी ठरवून दिलेले आहे. त्यामुळे चंद्रशेखर यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक बोलावली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघावर यावेळी भाजपचे विशेष लक्ष आहे.

ते घेतील कानोसा

आजच्या बैठकीत राजीव चंद्रशेखर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोघेही मार्गदर्शन करतील. तथापि, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचेही मुख्य भाषण होणार आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिकणे भाजपला शक्य आहे काय? याचा कानोसा चंद्रशेखर हे आमदारांकडून व मंत्र्यांकडून घेणार आहेत. गेल्यावेळी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सहकार्य केले नव्हते व त्यामुळे भाजपला दक्षिण गोवा मतदारसंघ गमवावा लागला होता. त्यावेळी बाबू कवळेकर हे देखील कॉंग्रेसमध्ये होते. यावेळी ढवळीकर, कवळेकर, रवी नाईक, सुभाष शिरोडकर आदींच्या भूमिका महत्त्वाच्या असतील.

सुदिन ढवळीकर व जीतही बैठकीस

आजच्या बैठकीत भाजपसह मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आलेक्स रेजिनाल्ड आंतोन वास हे सहभागी होतील. मंत्री बाबूश मोन्सेरात हे गोव्याबाहेर असल्याने बैठकीला पोहचणार नाहीत, असे भाजपला वाटते.

तिकिटाबाबतही चाचपणी

राजीव चंद्रशेखर हे आज पूर्ण दिवस गोव्यात असतील. रात्री ते दिल्लीला परततील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ रोजी गोव्यात दाखल होतील. राजीव चंद्रशेखर हे त्यावेळी गोव्यात नसतील. दक्षिण गोवा मतदारसंघात यावेळी भाजपने कुणाला तिकीट द्यावे याचा कानोसा चंद्रशेखर घेणार आहेत. काही इच्छुक उमेदवार चंद्रशेखर यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. उत्तर गोवा मतदारसंघातून लढण्यासाठीही भाजपमधील दोघे नेते इच्छुक आहेत. तेही स्वतंत्रपणे चंद्रशेखर यांना भेटतील. अशी माहिती मिळाली.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा