राज्यात पावसाचा जोरदार तडाखा

By Admin | Updated: June 15, 2015 01:27 IST2015-06-15T01:27:45+5:302015-06-15T01:27:45+5:30

पणजी/फोंडा : राज्यात रविवारी कोसळलेल्या सरींमुळे सरासरी पावसाची नोंद १४ इंच एवढी झाली आहे. १२ तासांत काणकोणमध्ये सर्वाधिक पावसाची म्हणजे २

Stormy rains in the state | राज्यात पावसाचा जोरदार तडाखा

राज्यात पावसाचा जोरदार तडाखा

इंच पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचा धडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाने जोर धरला असून रविवार हा पावसाचा दिवस ठरला. काणकोण व मडगाव भागात पहाटे लागलेला पाऊस दिवसभर चालू होता. पणजीतील पाऊस हा उसंत घेत पडणारा ठरला; परंतु मागील ३६ तासांत पणजीत ५ इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा, दाबोळी व सांगे भागातही जोरदार पाऊस कोसळला.
संततधार पावसाबरोबर जोराचा वाराही सुटल्याने राज्यात अनेक ठिकाणी पडझडही झाल्याची खबर आहे. रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबल्याचे २० कॉल्स अग्निशामक दलाला आले. त्याचप्रमाणे घरावर झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या. त्यापैकी एक घटना पेडणे येथे, तर एक कळंगुट येथे घडली, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.
संततधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत होते. सुकूर येथे भरून वाहणाऱ्या एका नाल्यात एक मुलगा पडल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करून त्याला सुरक्षितरीत्या वर काढण्यात आले. २४ तासांतील पावसामुळे पडझड व मालमत्तेची हानी झाली असली तरी जीवितहानी झाल्याची खबर नाही.
फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपेसह सत्तरी, डिचोली, पेडणे या तालुक्यांतही जोरदार पाउस पडला. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी दुपारनंतर मात्र पावसाने उसंत घेतली.
(प्रतिनिधी)

Web Title: Stormy rains in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.