फोंड्यात विक्रेत्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:47:09+5:302014-08-24T00:50:22+5:30
फोंडा : पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्केटजवळील मोडकळीस आलेली इमारतीची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडून ती माती मार्केटातील मुख्य प्रवेशद्वारावर टाकल्याने मार्केटमध्ये जाणारी

फोंड्यात विक्रेत्यांचा रास्ता रोको
फोंडा : पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्केटजवळील मोडकळीस आलेली इमारतीची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडून ती माती मार्केटातील मुख्य प्रवेशद्वारावर टाकल्याने मार्केटमध्ये जाणारी वाट बंद झाली़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी शनिवारी सकाळी दोन तास
रास्ता रोको केला.
येथील भिंत पाडणाऱ्या तसेच बाजारात जाणारी वाट अडवणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अटक करून या कामासाठी वापरण्यात आलेले जेसीबी मशीनही जप्त करण्याची व्यापाऱ्यांनी मागणी केली. फोंड्याचे मामलेदार अमोल गावकर व पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन विक्रेत्यांचे प्रमुख किशोर मामलेकर व इतर व्यापाऱ्यांशी चर्चा करून स्थिती नियंत्रणाखाली आणली. व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री १२.३0च्या सुमारास पालिका कर्मचाऱ्यांनी मार्केटातील जुनी इमारत मोडून ही माती बाजाराच्या प्रवेशद्वारावर टाकली होती. आज बाजाराचा दिवस असल्यामुळे भल्या पहाटे बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांना हा प्रकार आढळून आल्यानंतर बाजारात तणाव निर्माण झाला. तसेच संतप्त व्यापाऱ्यांनी संपूर्ण वाहतूक रोखल्याने तणावात भर पडली.
(पान २ वर)