कूळप्रश्नी प्रसंगी राज्यभर आंदोलन

By Admin | Updated: July 6, 2015 00:54 IST2015-07-06T00:54:26+5:302015-07-06T00:54:52+5:30

पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात मागच्या दारातून पुढे आणलेला कूळ व मुंडकार दुरु स्ती कायदा मागे घ्यावा, असा ठराव गोमंतक भंडारी समाजाच्या

Statewide agitation on the occasion of the Qila question | कूळप्रश्नी प्रसंगी राज्यभर आंदोलन

कूळप्रश्नी प्रसंगी राज्यभर आंदोलन

पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात मागच्या दारातून पुढे आणलेला कूळ व मुंडकार दुरु स्ती कायदा मागे घ्यावा, असा ठराव गोमंतक भंडारी समाजाच्या आमसभेत रविवारी घेण्यात आला. सरकारने माघार न घेतल्यास गोवाभर आंदोलनाचा इशाराही समाजातर्फे देण्यात आला. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष अनिल होबळे, उपाध्यक्ष आनंद शिरोडकर, रामदास नाईक, उपेंद्र गावकर, जोगुसो नाईक, अमृत आगरवाडेकर, देवानंद नाईक, अशोक नाईक, शुभांगी वायंगणकर, संध्या पालेकर, कालिदास नाईक आदी उपस्थित होते.
अनिल होबळे म्हणाले, सरकार बहुजन समाजाची गणसंख्या कागदोपत्री केवळ अडीच-तीन लाखच दाखविते. त्यासाठी बहुजन समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. हे काम प्राधान्याने हाती घेतले जाईल. काही आमदार-मंत्र्यांनी पक्षाविरोधात बोलत असल्याबद्दल मला सल्ला दिला; परंतु महासंघ होणे गरजेचे होते. त्यासाठी सर्वच समाजांनी माझी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. काहींनी तर समाज सोडा किंवा पक्ष सोडा, असेही सांगितले; परंतु मी समाज कदापि सोडणार नाही, असे त्यांना सांगितले आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आमसभेस सुरुवात झाली. रामदास नाईक यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले.(पान ८ वर)

Web Title: Statewide agitation on the occasion of the Qila question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.