राज्यात संततधार; आजही मुसळधार शक्य
By Admin | Updated: September 24, 2016 02:45 IST2016-09-24T02:44:28+5:302016-09-24T02:45:01+5:30
पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत.

राज्यात संततधार; आजही मुसळधार शक्य
पणजी : संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. क्षणाचीही उसंत न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्या शनिवारीही काही भागांत मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी गोव्यात पोहोचू शकल्या नाहीत.
येथील वेधशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अजून आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संततधार आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचेच आहेत. राजधानी पणजीत शुक्रवारी सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत २३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पणजीत दिवसभर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक मेटाकुटीला आले. रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्या. राज्यात काही अपघातही घडले. दोन दिवसांपूर्वीच अंजुणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)