मराठी चित्रपट महोत्सवासाठी तार्‍यांची मांदियाळी

By Admin | Updated: May 24, 2014 00:26 IST2014-05-24T00:25:48+5:302014-05-24T00:26:03+5:30

मराठी चित्रपट महोत्सवासाठी तार्‍यांची मांदियाळी

Stars of Marathi Film Festival | मराठी चित्रपट महोत्सवासाठी तार्‍यांची मांदियाळी

मराठी चित्रपट महोत्सवासाठी तार्‍यांची मांदियाळी

पणजी : ६ जूनपासून शहरात होणार असलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवासाठी मराठीतील अनेक नवे, जुने सिने कलाकार, निर्माते, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत. रितेश देशमुख, अशोक सराफ, श्रेयस तळपदे, अमृता सुभाष, प्रिया बापट हे महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. निर्मार्त्यांमध्ये रवी जाधव, सतीश मनवार, किरण यज्ञोपवित, सुनील सुखटणकर, सुमित्रा भावे, गजेंद्र अहिरे व नागराज मंजुळे यांचा समावेश असेल. अभिनेत्री सई ताम्हणकर, मिलिंद सोमण यांची उपस्थितीही अपेक्षित आहे. सई अलीकडेच तिच्या ‘नो एंट्री, पुढे धोका आहे’ या चित्रपटातील बिकिनीतील दृश्यामुळे बरीच गाजत आहे. या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात झाले होते. या चित्रपट महोत्सवात रितेश याचा ‘येलो’ चित्रपट दाखवला जाईल. श्रेयस आपल्या ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटाच्या शो साठी मुद्दाम उपस्थित राहणार आहे. अशोक सराफ याचा ‘आंधळी कोशिंबीर’ चित्रपट दाखवण्यात येणार असल्याने त्यासाठी सराफ यांना खास निमंत्रण आहे. आशालता वाबगावकर यांना या महोत्सवात कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘अन्वत’ व ‘बायोस्कोप’ हे दोन चित्रपट प्रथमच या महोत्सवात दाखवले जातील. ‘रेगे’ हा अद्याप रीलिज व्हायचा असलेला चित्रपटही या महोत्सवात दाखवला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stars of Marathi Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.