क्रीडामंत्र्यांनी घेतली जखमी खेळाडूंची भेट

By समीर नाईक | Updated: October 26, 2023 16:28 IST2023-10-26T16:28:13+5:302023-10-26T16:28:46+5:30

महाराष्ट्र संघातील एक रग्बी खेळाडू आणि वेटलिफ्टरसह अन्य दोन जण गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल आहेत.

Sports Minister visited the injured players in goa | क्रीडामंत्र्यांनी घेतली जखमी खेळाडूंची भेट

क्रीडामंत्र्यांनी घेतली जखमी खेळाडूंची भेट

पणजी - राज्यात सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गेल्या दोन दिवसात सुमारे ४ खेळाडू जखमी झाले असून, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गुरुवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या खेळाडूंची भेट घेत विचारपूस केली, तसेच त्यांना आवश्यक सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 

महाराष्ट्र संघातील एक रग्बी खेळाडू आणि वेटलिफ्टरसह अन्य दोन जण गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल आहेत. राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षतेहेतू आणि दुखापत झालेल्या खेळाडूंवर लवकरात लवकर उपचार व्हावे यासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयातर्फे खास वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी वेगळा कक्ष उभारला आहे, तसेच अनेक रुग्णवाहिका फक्त राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेवा देण्यासाठीच ठेवण्यात आले आहे.

Web Title: Sports Minister visited the injured players in goa

टॅग्स :goaगोवा