शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाैदलासाठी बनविले खास हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 04:46 IST

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते अनावरण : सागरी सुरक्षेला बळ मिळणार

पणजी : भारतीय नौदलासाठी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडतर्फे’ (एचएएल) बनविलेल्या ‘एएलएच एमके ३’ या अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा सहा हेलिकॉप्टरचे सोमवारी अनावरण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व संरक्षण दलांचे बळ वाढवण्यासाठी सदैव पुढाकार घेतलेला आहे. ‘एचएएल’ कंपनीला नौदलासाठी या बनावटीची एकूण १६ हेलिकॉप्टर बांधण्याचे काम दिले असून, उर्वरित दहा हेलिकॉप्टरही नौदलात सामील होतील, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. दाबोळी येथील नौदलाच्या हद्दीत आयोजित हा कार्यक्रम झाला.यावेळी भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. हरी. कुमार, भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फिलिपिनोझ पायनमुत्तील, ‘एचएएल’ चे सीएमडी आर. माधवन, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सुविधांचा समावेश...‘एचएएल’ ने बांधलेल्या हेलिकॉप्टरमध्ये वैद्यकीय सुविधा, शोधमोहिमेसाठी लागणारी अत्याधुनिक प्रणालींचा समावेश करण्यात आल्याची माहिती एचएएलचे आर. माधवन यांनी दिली. भारतीय तटरक्षक दलासाठीही हेलिकाॅप्टर बनविले जात आहे. चाचण्या पूर्ण होताच त्यांना देशसेवेत रुजू केले जाईल. यामुळे देशाच्या सागरी सुरक्षेत आणखी वाढ होणार आहे. इतर दहा हेलिकॉप्टर वर्षभरात भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यांचीही गोवा नौदलाच्या तळावर चाचणी केली जाईल. नौदलाला या हेलिकॉप्टरचा चांगला फायदा होईल, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल