शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 19:44 IST

गोव्यातील पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंडा या पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे बनविण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पणजीत त्याचे उद्घाटन केले. 

पणजी: गोव्यातील पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंडा या पोलीस स्थानकात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विशेष कोपरे बनविण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पणजीत त्याचे उद्घाटन केले. इतर पोलीस स्थानकातही ही व्यवस्था नंतर केली जाणार आहे. बाल कल्याण समितीच्या शिफारशींकार्यवाही करताना पोलीस खात्याकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. अनेक प्रकारच्या गुन्ह्यात पिडीत बालकांना पोलीस स्थानकात यावे लागते. पोलीस स्थानकात त्यांना योग्य वातावरण मिळावे यासाठी त्यांचे मन रमेल अशी व्यवस्था उभारण्याची शिफारस समितीने केली होती. पणजी पोलीस स्थानकात एका खोलीत तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात खेळणी, कार्टुन चित्रे आणि इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. शिवाय मुलांचे मनोरंजन करण्यासाठी कर्मचा-यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फोंडा, म्हापसा, वास्को आणि मडगावमध्येही तशीच व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अनेक प्रकरणात पीडित मुलांना पोलीस स्थानकात यावे लागते. तसेच ब-याच प्रकारात संशयितांची निष्पाप मुलेही पोलीस स्थानकात येत असतात. त्यांच्या सोयीसाठीही ही व्यवस्था अहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस