दक्षिण गोवा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

By Admin | Updated: May 15, 2014 09:57 IST2014-05-15T01:05:22+5:302014-05-15T09:57:59+5:30

मडगाव : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण होत आली असून या मतमोजणीच्यावेळी तब्बल १0३ काउंटिंग एजंट उपस्थित राहणार आहेत.

South Goa administration ready for counting | दक्षिण गोवा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

दक्षिण गोवा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज

मडगाव : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण होत आली असून या मतमोजणीच्यावेळी तब्बल १0३ काउंटिंग एजंट उपस्थित राहणार आहेत. निर्वाचन अधिकारी असलेले दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी उमेदवार व निवडणूक एजंटांबरोबर बुधवारी घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. दामोदर महाविद्यालय व कारे महाविद्यालय अशा दोन ठिकाणी ही मतमोजणी होणार असून ही मतमोजणी एकूण दहा दालनात होणार आहे. या मतमोजणीसाठी दहा साहाय्यक निर्वाचन अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून सुरुवातीला टपालाव्दारे आलेल्या मतांची मोजणी होणार असून नंतर मत यंत्रातील मते मोजली जाणार आहेत. कारे महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात सांगे, मुरगाव, वास्को, केपे, शिरोडा वकाणकोण व दुसर्‍या टप्प्यात सावर्डे, कुठ्ठाळी दाबोळी, कुडचडे, मडकई व फोंडा या मतदारसंघांतील मतांची मोजणी हाती घेणार आहे तर दामोदर महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात नुवे, कुडतरी, फातोर्डा व बाणावली तर दुसर्‍या टप्प्यात वेळ्ळी, कुंकळ्ळी, मडगाव व नावेली या मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून मतांची संख्या जास्त असल्यास ती तिसर्‍या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: South Goa administration ready for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.