एल्वीस गोम्सविरुद्ध ठोस पुरावे
By Admin | Updated: July 7, 2016 02:39 IST2016-07-07T02:34:21+5:302016-07-07T02:39:17+5:30
पणजी : गृहनिर्माण घोटाळा प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे आता तुरुंग महानिरीक्षकपदी असलेले एल्वीस गोम्स

एल्वीस गोम्सविरुद्ध ठोस पुरावे
पणजी : गृहनिर्माण घोटाळा प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे आता तुरुंग महानिरीक्षकपदी असलेले एल्वीस गोम्स यांनी म्हटले असले तरी
भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावावर गोम्स यांचीच स्वाक्षरी असल्याचा दावा भ्रष्टाचारविरोधी पथकाने केला आहे. ही स्वाक्षरी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
गृहनिर्माण मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मडगाव येथे सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्यासाठी गृहसचिवांना पाठविलेल्या प्रस्तावावर गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय
संचालक म्हणून गोम्स यांचीच
स्वाक्षरी असल्याचे एसीबीचे अधीक्षक विमल गुप्ता यांनी सांगितले. ही स्वाक्षरी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविली जाणार असल्याचे ते म्हणाले.
माजी पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि गृहनिर्माण महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एल्वीस गोम्स यांच्या विरुद्ध एसीबीने भूखंड घोटाळ्याचा
गुन्हा नोंदविला होता. मडगाव येथे ३०२२६ चौरस मीटर भूखंड गृहनिर्माणासाठी संपादन करीत असल्याचे सांगून ‘सेटलमेंट’ विभागात रूपांतर करून घेऊन नंतर भूसंपादन प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर
त्या जमिनीचे व्यावसायिक विभागात रूपांतरण करून तिची विक्रीही
केली होती.
या प्रकरणात हळर्णकर व
गोम्स यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्यामुळे
या प्रकरणात गुन्हा नोंदविला
होता.
या प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविल्यामुळे गोम्स यांनी
तुरुंग महानिरीक्षक पदाचा राजीनामाही सादर केला आहे.
आपला या घोटाळ्याशी काहीही संंबंध नसताना आपल्याला त्यात गोवल्याचे तसेच त्या काळात
आपण गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालकही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याविषयी एसीबीचे अध्यक्ष गुप्ता यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
(प्रतिनिधी)