लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात १६ वर्षे वयाखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंट वापरावर बंदी घालण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी सांगितले.
'ऑस्ट्रेलियाने यासंबंधी कायदा आणून बंदी लागू केली आहे व तेथे चांगले परिणाम दिसून आले. तशाच प्रकारचे पाऊल गोव्यातही उचलता येणे शक्य आहे का, याबाबत अभ्यास सुरू आहे' असे खंवटे यांनी सांगितले. मंत्री खंवटे म्हणाले की, 'आजकाल लहान मुले पावलोपावली मोबाइल फोनवर इंटरनेट सर्फिग करून वेगवेगळ्या साईटस पाहतात. त्या सर्व चांगल्या असतातच असे नव्हे. याचा शिक्षणावरही गंभीर परिणाम होतो. विद्यार्थ्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी किमान १६ वर्षांखालील मुलांवर तरी सोशल मीडियाच्या बाबतीत बंदी यायला हवी. त्यासाठी कायद्याच्या किंवा इतर माध्यमातून ज्या काही गोष्टी करणे शक्य आहे त्या आम्ही करू.'
रात्री १० नंतर म्युझिक बंदी : मुख्यमंत्री तोडगा काढतील
दरम्यान, 'विवाह सोहळ्यांनाही रात्री १० नंतर संगीत वाजवता येणार नाही, अशी जी कठोर भूमिका राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे, त्याबद्दल विचारले असता पर्यटनमंत्री या नात्याने खंवटे म्हणाले की, 'गोव्यात ख्रिस्ती किंवा हिंदू बांधवांचे विवाहसोहळे रात्री उशिरापर्यंत चालतात. त्यामुळे रात्री १० नंतरही संगीत वाजवण्याची मुभा मिळायला हवी. गोवा हे पर्यटनस्थळ आहे. रात्री १० वाजताच सर्व बंद झाले, तर कोण गोव्यात येईल? मी मुख्यमंत्र्यांकडे यावर बोललो आहे. तेच तोडगा काढतील.'
Web Summary : Goa considers banning social media for those under 16, following Australia's lead. Minister Khawte cites negative impacts on education and advocates for restrictions via law or other means. He also addressed music ban concerns for weddings, seeking a solution with the Chief Minister.
Web Summary : गोवा सरकार 16 साल से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाने पर विचार कर रही है। मंत्री खंवटे ने शिक्षा पर नकारात्मक प्रभाव का हवाला देते हुए प्रतिबंध का समर्थन किया। विवाह समारोहों में संगीत प्रतिबंध पर मुख्यमंत्री से समाधान की अपील की।