कळंगुटमध्ये सापांचे
By Admin | Updated: July 15, 2014 01:14 IST2014-07-15T01:11:40+5:302014-07-15T01:14:59+5:30
बार्देस : कळंगुट येथील दोन दुकानांवर टाकलेल्या छाप्यांत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीचे सापांचे अवशेष जप्त केले.

कळंगुटमध्ये सापांचे
बार्देस : कळंगुट येथील दोन दुकानांवर टाकलेल्या छाप्यांत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीचे सापांचे अवशेष जप्त केले.
एका ‘एनजीओ’चे प्रतिनिधी गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कळंगुट पोलिसांनी ‘ओम शॉप कळंगुट’ व ‘काश्मिरी मेमोरी’ या दोन दुकानांवर सोमवारी दुपारी छापे टाकले. या प्रकरणात सहभाग असलेले रवी चव्हाण व अल्ताफ हे संशयित सापडू शकले नाहीत. मात्र, या पोलिसांनी दोन्ही दुकानांतील काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन दुकानांना कुलपे ठोकली.
वरील दोन्ही दुकानांत सापांचे सापळे, कातडी व हाडांपासून तयार केलेले रिंग मिळत असल्याची माहिती मिळताच गौरव गुप्ता यांनी कळंगुट पोलिसांना कळविले.
पोलीस निरीक्षक राजेशकुमार, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर,
श्रीकांत पेडणेकर तसेच विजय पिळणकर, सूरज गोवेकर, विजय पाळणी यांनी या दोन्ही दुकानांवर दुपारी २.३० वाजता छापे घातले. यात सापांची हाडे, सापळे, कातडी तसेच इतर वस्तू मिळून ३ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
(प्रतिनिधी)