शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर १ कोटी ११ लाख ५८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 20:59 IST

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने रविवारी केलेली ही कारवाई या आर्थिक वर्षातील तस्करीच्या सोन्याची सर्वांत मोठी कारवाई आहे.

वास्को: दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर इंडिया’ विमानाच्या शौचालयात लपवून ठेवलेल्या तस्करी सोन्याची तीन बिस्किटे कस्टम विभागाने रविवारी (दि. १५) कारवाई करून जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्किटे 2 किलो ९७६ ग्राम वजनाची असून त्यांची एकूण किंमत १ कोटी ११ लाख ५८ हजार ८८४ रुपये आहे. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने रविवारी केलेली ही कारवाई या आर्थिक वर्षातील तस्करीच्या सोन्याची सर्वांत मोठी कारवाई आहे.

रविवारी दाबोळी विमानतळावर दुबईहून उतरलेल्या विमानात (एआय ९९४) तस्करीचे सोने लपवण्यात आलेले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या विमानात तपासणीला सुरवात केली. दाबोळी विमानतळावर उतरलेले हे विमान नंतर येथून प्रवाश्यांना घेऊन बंगळूरला जाणार होते. सदर विमान बंगळूरला जाण्यापूर्वी यात कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली असता विमानातील शौचालयात एक पिशवी लटकवून ठेवल्याचे अधिका-यांच्या नजरेस आले. सदर पिशवी कस्टम अधिका-यांनी ताब्यात घेऊन तपासणी असता त्यांना यामध्ये तीन सोन्याची बिस्किटे असल्याचे निदर्शनास झाले.

कस्टम अधिका-यांनी त्वरित सदर विमानात प्रवास करणा-या प्रवाश्यांना हे सोने कोणाचे आहे, याबाबत विचारपूस केली असता या सोन्यावर कोणीही दावा केला नसल्याची समजले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याच्या एका बिस्किटाचे वजन ९९२ ग्राम असून तीनही सोन्याच्या बिस्किटांचे एकूण वजन २ किलो ९७६ ग्राम असल्याची माहिती सांगण्यात आली. या सोन्यावर कोणीच दावा केला नसल्याने १९६२ च्या कस्टम कायद्याखाली सदर सोने जप्त करण्यात आल्याची माहिती विभागातील सुत्रांनी दिली.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर राजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली आहे. विमानातील शौचालयात लपवून आणलेले हे तस्करीचे सोने कुठे नेण्यात येत होते, ते आणण्यामागे कोणाचा हात आहे अशा विविध गोष्टीबाबत कस्टम अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी