धुवाँधार!

By Admin | Updated: June 20, 2014 02:43 IST2014-06-20T02:39:03+5:302014-06-20T02:43:15+5:30

पणजी : मुसळधार पावसाने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही राज्याला झोडपले. नऊ तासांत दीड इंच तर ३६ तासांत २.५९ इंच पावसाची नोंद झाली.

Smooth! | धुवाँधार!

धुवाँधार!

पणजी : मुसळधार पावसाने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही राज्याला झोडपले. नऊ तासांत दीड इंच तर ३६ तासांत २.५९ इंच पावसाची नोंद झाली. संततधार राहिल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. राजधानीत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी तुंबले. परिणामी दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले. म्हापशात काही दुकानांमध्ये पाणी शिरले. झाडांची पडझड तसेच वीज खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. एकूण मोसमी पाऊस १५ इंचांवर पोहोचला.
हवामान वेधशाळा संचालक के. व्ही. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी २४ तासांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि समुद्र खवळलेला असेल. गुरुवारी पावसाने जोर धरला असला तरी तुलनेत प्रमाण १११.२ मि.मी. म्हणजेच ४.३७ इंचांनी कमीच आहे.
अग्निशामक दलाला दिवसभरात पडझडीचे ४२ कॉल्स आले. घरांवर झाडे कोसळून नऊ ठिकाणी नुकसान झाले. मडगाव परिसरात ३, पेडणे तालुक्यात २, काणकोणात २ तर कुडचडे आणि कुंडई येथे प्रत्येकी एका घरावर झाड पडले. सुदैवाने जीवितहानी मात्र झालेली नाही. व्हडलेभाट, ताळगाव येथे रस्त्यावर माड पडल्याने वाहतूक खोळंबली. मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी किरकोळ अपघातही झाले. वीजवाहिन्यांवर वृक्ष कोसळल्याने अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती.
(प्रतिनिधी)
काणकोणात सर्वाधिक पाऊस
काणकोण तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक २.६२ इंच पाऊस झाला. वाळपईत २.५५, साखळीत १.८२, मडगावात १.७१, केपेत १.४४, पेडणे तालुक्यात १.४४, म्हापशात 0.८२ इंच पावसाची नोंद झाली. फोंड्यात १५ तर मुरगाव तालुक्यात सर्वात कमी केवळ ८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Smooth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.