शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीची कत्तल; कंत्राटदार अटकेत

By admin | Updated: November 29, 2014 01:01 IST

पणजी : दिवाडी येथे एका बांंधकामासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी कापण्याचा प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आल्यावर गोवा किनारपट्टी

पणजी : दिवाडी येथे एका बांंधकामासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटी कापण्याचा प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आल्यावर गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने नोंदविलेल्या तक्रारीनुसार जुने गोवे पोलिसांनी कारवाईत वासुकी शेट नामक कंत्राटदाराला अटक केली. एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने या प्राधिकरणाकडे तसेच बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि अन्य संबंधित यंत्रणांकडे यासंबंधी तक्रार केली होती. या पर्यावरणप्रेमीने खारफुटीच्या कत्तलीचे चित्रीकरण करून सीडीही सरकारी यंत्रणांना पाठवली होती. प्राधिकरणाने डॉ. आंतोनियो मास्कारेन्हस तसेच नितीन सावंत या दोन तज्ज्ञांना चौकशीसाठी नेमले असता, मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले. मध्यंतरी काही दिवस हे काम बंद होते; परंतु शुक्रवारी त्या ठिकाणी मजूर खारफुटी कापत असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वासुकी शेट या कंत्राटदाराला १९८६च्या पर्यावरण संवर्धन कायद्याच्या कलम १५खाली अटक केली. आपण राव नामक व्यक्तीसाठी हे काम करीत होतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. जुने गोवेचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण सिनारी यांनी यास दुजोरा दिला. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले यांना विचारले असता, प्राधिकरणाने पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यानुसार आता कारवाई झालेली आहे, असे सांगितले. दिल्लीतील एक बडा उद्योजक या ठिकाणी हॉटेल बांधत असल्याची माहिती मिळते. स्थानिक ग्रामपंचायतीकडून साफसफाईसाठी म्हणून परवानगी घेण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात तेथे खारफुटी कापण्याचे काम चालले होते. दरम्यान, वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)