सेसाने उत्खनन बंद करून दाखवावेच
By Admin | Updated: December 21, 2015 02:03 IST2015-12-21T02:03:19+5:302015-12-21T02:03:57+5:30
पणजी : खनिज उत्खनन बंद करण्याच्या सेसा वेदांताने दिलेल्या इशाऱ्यावरून ट्रकमालक आणखी संतप्त बनले असून

सेसाने उत्खनन बंद करून दाखवावेच
पणजी : खनिज उत्खनन बंद करण्याच्या सेसा वेदांताने दिलेल्या इशाऱ्यावरून ट्रकमालक आणखी संतप्त बनले असून उत्खनन बंद करून दाखवाच, असे आव्हान ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी दिले आहे. सरकारने खाण लिजेस लिलावात न काढता मर्जीतील खाणमालकांना वाटल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रतिनिधीजवळ गावस यांनी, उद्या सोमवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. तोडगा न निघाल्यास काय घडेल याचा नेम नाही, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला आहे. आडमुठे धोरण स्वीकारून खाणी बंद करण्याची भीती वेदांताने घालू नये. असल्या धमक्यांना ट्रकमालक भीक घालणार नाहीत. खाणी ही जनतेची संपत्ती आहे. खरे तर खाण लिजेसचा लिलाव व्हायला हवा होता; परंतु वेदांतासारख्या कंपन्यांना नूतनीकरणाने सरकारकडून आंदण मिळाल्या आहेत, त्या योग्य रितीने चालविण्याचे सोडून धमक्यांचे सत्र आरंभले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर उतरल्यामुळे वाहतूक दर वाढवून देता येणार नाही ही खाण कंपन्यांनी घेतलेली भूमिका ट्रकमालक मानायला तयार नाहीत. १७.६३ रुपये प्रतिकिलोमीटर प्रतिटन दर हवा. गावस म्हणाले की, सध्याचा ८ रुपये प्रतिटन वाहतूक दर मुळीच परवडणारा नाही. खाणी बंद झाल्या तेव्हा डिझेल ३९.६0 रुपये लिटर होते. आज डिझेलचा भाव ४८.१८ रुपये लिटरवर पोहचला आहे. त्यामुळे ट्रकमालकांना दर वाढवून मिळायलाच हवा. यावर आम्ही चार वेगवेगळे मार्ग सुचविले होते, तेही कंपन्यांना मान्य नाहीत. नुकसानी होत असेल तर ती खाण कंपन्या, सरकार आणि ट्रकमालक या तिघांनीही मिळून सोसायला हवी; केवळ ट्रकमालकांवर अन्याय करून (पान २ वर)