शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

गोव्यापेक्षा सिल्वासा महाग ! सिने निर्मात्यांनी गोव्यातून बस्तान हलवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:14 IST

दमणला 'लोकेशन'साठी स्पर्धा व भाववाढ

पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने महामारीच्या पार्श्वभूमीवर अचानक सिनेमा तसेच वेगवेगळ्या चॅनलवरील मालिकांच्या गोव्यात चालू असलेल्या चित्रीकरणाचे सर्व परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे, सिने निर्मात्यांनी गोव्यातून सिल्वासा, दमणकडे बस्तान हलविले खरे, परंतु तेथे  लोकेशनसाठी मागणी वाढल्याने प्रचंड भाववाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका निर्मात्यांना बसत आहे.

गोव्यात गेले काही दिवस मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण चालले होते. कोरोना महामारीमुळे मनोरंजन संस्थेने या सर्व चित्रीकरणांचे परवाने रद्द केले. त्यानंतर, निर्मात्यांनी दादरा, नगर हवेली, सिल्वासा-दमणला आपला मोर्चा वळविला. कोविड महामारीच्या या काळात देशात ज्या काही मोजक्याच ठिकाणी चित्रीकरणाला परवानगी आहे. त्यात सिल्वासा, दमणचा समावेश आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तेथे गर्दी केलेली आहे.

सोनी मराठी चॅनलवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्या अलका कुबल चमूसह गोव्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनाही गोव्यातून माघारी जावे लागले. त्या म्हणाल्या की, सिल्वासा येथे लोकेशनसाठी प्रचंड स्पर्धा असून भाववाढ झालेली आहे. अक्षरशः लुटालूट चालू असल्याचे त्यांनी म्हटले.

स्टार प्लस हिंदी चॅनलवरील 'ये है चाहतें', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'आप की नजरोंनें समझा' तसेच 'गुम है किसी के प्यार में' तर मराठी स्टार प्रवाह चॅनलवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते', 'रंग माझा वेगळा,' झी मराठीवरील 'अगंबाई, सुनबाई', तसेच कलर्स मराठीवरील 'ऑनलाइन शुभमंगल', सोनी मराठीवरील 'आई माझी काळुबाई', या मालिकांचे चित्रीकरण गोव्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात चालू होते. या मालिकांच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी सध्या सिल्वासा दमणला तळ ठोकल्याने तेथे लोकेशनची मागणी वाढली आहे. व्हिल्ला किंवा बंगले असलेल्यांची चित्रीकरणासाठी देण्याच्याबाबतीत चांगलीच चांदी झालेली आहे. 

टॅग्स :goaगोवाcinemaसिनेमाcorona virusकोरोना वायरस बातम्या