गोव्यात हंगामी सभापतीपदी सिद्धार्थ कुंकळ्येकर
By Admin | Updated: March 15, 2017 14:19 IST2017-03-15T14:19:40+5:302017-03-15T14:19:40+5:30
पणजीचे भाजपा आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना हंगामी सभापती म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडून बुधवारी सायंकाळी शपथ दिली जाणार आहे.

गोव्यात हंगामी सभापतीपदी सिद्धार्थ कुंकळ्येकर
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - पणजीचे भाजपा आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना हंगामी सभापती म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडून बुधवारी सायंकाळी शपथ दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करतील. त्यावेळी हंगामी सभापती म्हणून कुंकळ्येकर काम पाहतील. कुंकळ्येकर हे दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना हंगामी सभापती हा मान प्रथमच मिळत आहे. विधानसभेच्या सर्व नवीन सदस्यांना हंगामी सभापती उद्या शपथ देण्यात येणार आहे. (खास प्रतिनिधी )
आणखी बातम्या