शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद जेव्हा स्वामी होतात; खासदारकीची २५ वर्ष अन् भाजपमधील कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:14 IST

नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. १९९९ साली श्रीपादजी प्रथम खासदार झाले होते. ९० च्या दशकाच्या अखेरीस मडकई मतदारसंघात श्रीपाद नाईक विधानसभा निवडणूक हरले नसते तर ते कदाचित लोकसभेचे सदस्यही कधी होऊ शकले नसते. त्यांच्या वाट्याला वाजपेयी, मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याचे भाग्यही कदाचित आले नसते. मात्र, दैवगती वेगळी असते. त्यामुळे ते सरपंच ते केंद्रीय मंत्री असा तेजस्वी प्रवास करू शकले. अत्यंत भीषण अपघातात ते अलीकडेच बचावले. त्या अपघातात त्यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सगळेच गोमंतकीय त्यावेळी हळहळले. बुधवारी श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या पत्नीची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.

श्रीपाद नाईक हे भाजपमधील स्वामीच आहेत किंवा ते भाजपचे स्वामीच आहेत, अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाऊंच्या वाढदिवस सोहळ्यात केले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी प्रथम आपल्या भाषणात श्रीपादजींना 'स्वामी' ही पदवी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपादजींचा 'स्वामी' असाच उल्लेख केला. कारण श्रीपाद नाईक नेहमीच संत सज्जन, साधू-स्वामी यांच्या सहवासात रमतात. त्यामुळे ते भाजपसाठी किंवा भाजपचे स्वामीच आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीपाद नाईक यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान म्हणजे दिल्लीला जाणाऱ्या गोमंतकीयांचे हक्काचे घरच जणू, गोव्याहून भाऊंच्या परिचयाची कुणीही व्यक्ती दिल्लीला गेली की, श्रीपादजींच्या घरी जाते. तिथे चांगले आदरातिथ्यही होते आणि गरज पडल्यास निवासाचीही व्यवस्था होते. मुख्यमंत्री सावंत यांनीही नाईक यांच्या स्वभावगुणांचे कौतुक केले. 

गोव्यात जे केंद्राचे विविध प्रकल्प उभे राहिले, त्यात नाईक यांचे योगदान आहेच. श्रीपाद नाईक यांना चांगल्या अर्थाने 'स्वामी' ही पदवी मुख्यमंत्री व इतरांनी दिली. मात्र, नाईक यांना कुणी मठात मात्र बसवू नये, त्यांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी मागणी श्रीपादजींच्या समर्थकांकडून मनोमन केली जाईलच. श्रीपाद नाईक यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भाऊंना खासदार करण्यासाठी तळमळत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात अजूनही तिकिटाविषयी धाकधूक आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः श्रीपाद नाईकदेखील अस्वस्थ झाले होते. 

सदानंद तानावडे राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी तानावडे यांचा धसका भाऊंनी काही प्रमाणात घेतला होताच. तानावडे उत्तर गोव्यात खूप फिरत होते. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीवेळी तिकिटावर दावा करतील, असे भाऊ समर्थकांना वाटत होते. मात्र, तानावडे राज्यसभेवर गेले व तो प्रश्न मिटला. बुधवारी योगायोगाने तानावडे हे एकटेच श्रीपादजींच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्याचे कारण एवढेच की, त्यांना दोन दिवस ताप येत होता व प्रकृती ठीक नव्हती. श्रीपाद नाईक यांनी भाजपच्या एका बैठकीतदेखील काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या तिकिटाविषयी शंका विचारली होती. 

मात्र, लोकसभेसाठी भाजपचे तिकीट हे शेवटी दिल्लीत ठरते, गोव्यात ठरत नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हयात होते तेव्हा मात्र भाजपचे सगळे महत्त्वाचे निर्णय गोव्यात होत असत. आता 'सब कुछ दिल्ली' अशी स्थिती आहे. पर्रीकर यांच्या शब्दाला मोठे वजन होते म्हणूनच विनय तेंडुलकर यांना राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळाली होती. पर्रीकर व श्रीपाद नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष हा वीस- बावीस वर्षे गोव्यात अनुभवायला मिळाला. १९९९ साली मडकईमध्ये भाऊंचा पराभव झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका आल्या व मग भाऊ दिल्लीत पोहोचले ते कायमचेच. त्यांनी सातत्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे. एकदाही ते लोकसभेची निवडणूक हरले नाहीत, हे विशेष. 

केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएची राजवट होती तेव्हादेखील भाऊ उत्तरेत जिंकलेच. आता यावेळी अनेकजण बाशिंग बांधत आहेत. श्रीपादभाऊ स्पर्धेत आहेतच. भाऊ हे सज्जन व स्वामी असले तरी ते मठात बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना अडवाणीप्रमाणे कुणी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पाठविण्याचा विचार करू नये एवढेच.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा