श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद निश्चित; मोदींशी नेत्यांची चर्चा

By Admin | Updated: May 21, 2014 02:01 IST2014-05-21T01:55:05+5:302014-05-21T02:01:36+5:30

पणजी : उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे निश्चित झाले आहे.

Shripad Naik appointed minister; Discussion of Modi leaders | श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद निश्चित; मोदींशी नेत्यांची चर्चा

श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद निश्चित; मोदींशी नेत्यांची चर्चा

 पणजी : उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्याविषयी चर्चा केली. पर्रीकर यांच्यासोबत खासदार श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सुदिन ढवळीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, गोविंद पर्वतकर, सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, दत्ता खोलकर, सतिश धोंड यांनी मिळून मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री बुधवारी गोव्यात दाखल होतील. मंत्री पार्सेकर मंगळवारी सायंकाळी गोव्यात परतले. श्रीपाद नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देणे निश्चित झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. वन, पर्यावरण, खाण किंवा पर्यटन यापैकी एक-दोन खाती नाईक यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितले, की मोदी यांच्यामागे मंत्रिपदासाठी मागणी करत राहण्याची ही वेळ नव्हे. मोदी यांना त्यांची टीम उभी करण्यासाठी सर्वांनीच पुरेसा वेळ द्यायला हवा. अकारण दबाव आणण्याची गरज नाही. टीम उभी करणे हे काम आव्हानात्मक आहे. मंत्रिपदाबाबत गोव्याची दखल मोदी निश्चितच घेतील. (खास प्रतिनिधी)

Web Title: Shripad Naik appointed minister; Discussion of Modi leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.